About Us
* आरोग्य धनसंपदा : जन आरोग्य योजना
* आमच्या संस्थेच्या या नवीन उपक्रमा विषयी आपणास माहिती सांगताना आम्हाला अति आनंद होत आहे.
* जेव्हा आपण शहर , ग्रामीण अथवा कुठल्याही खाजगी व सरकारी रुग्णालया मध्ये जातो तेव्हा पैशासाठी होनारी नातेवाईकांची दगदग दैनंदिन जिवनामध्ये आपन बघत असतो.
* रुग्णांचा व रुग्णांच्या नातेवाईकांचा हॉस्पिटल मध्ये लागणाऱ्या पैशांचा भार कमी करण्यासाठी भारती जनकल्याण फाउंडेशन मार्फत आरोग्य धनसंपदा : जन आरोग्य योजना या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमा च्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या डोळ्या समोर गोरगरिबांची सेवा कशी करता येईल हे ध्येय होते , आणि ते आम्ही या उपक्रमांतर्गत कार्यान्वित केले आहे त्याची थोडक्यात माहिती मांडत आहोत
* आजच्या दगदगी च्या युगामध्ये माणसाचे आयुष्य फार धोकादायक झाले आहे त्यात जर कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर आपणास सर्व कामे बाजूला ठेवून त्या व्यक्तीची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे लागते , तेव्हा आपण रुग्णाच्या उपचारा मध्ये होणाऱ्या खर्चाचा कसल्याही प्रकारचा विचार न करता रुग्णाला चांगल्यात चांगल्या रुग्णालया मध्ये ऍडमिट कसे करता येईल याचा विचार आपण करीत असतो , तुमच्या रुग्णांचा हॉस्पिटल मध्ये होणारा खर्च पैशाच्या रूपाने काही प्रमाणात का होईना कसा कमी करता येईल यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत.
* आपल्या जालना , छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तज्ञ व नामांकित वैद्यकीय सेवेतील डॉक्टर यांना आरोग्य धनसंपदा: जन आरोग्य योजना या उपक्रमात सहभागी करण्यात आले आहे . या प्रकल्पा (योजना) मध्ये आपल्या कुटुंबातील नऊ सदस्यांना सवलतीच्या दरात उपचार करून घेता येईल या संपूर्ण प्रकल्पाची (योजनेची) सविस्तर माहिती आपणास आमच्या हेल्पलाइन क्रमांकावर मिळू शकते . या उपक्रमाची माहिती आम्ही ग्रामीण भागातील विविध ठिकाणी जाऊन लोकांपर्यंत पोहोचविण्याचे एक पवित्र कार्य करीत आहोत.
* हे पवित्र व समाजसेवेचे कार्य करीत असताना आम्हाला आपल्या समाजातील सामाजिक जाण असणारे व समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनाशी बाळगणारे उच्चशिक्षित व नामांकित वेदकीय सेवेतील डॉक्टरांचे अनमोल सहकार्य लाभले आहे . आम्ही भारती जनकल्याण फाउंडेशन मार्फत सदैव रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर आहोत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. धन्यवाद.....🙏
रुग्ण पोषण आहार योजना
देशाच्या राष्ट्रपती द्रोपती मुरमुजी यांच्या संकल्पनेतून टीबी मुक्त भारत अभियान या अभियानास मदत रुपी भारती जनकल्याण फाउंडेशन ची रुग्ण पोषणआहार योजना या योजनेअंतर्ग त किमान 7000 रुग्णांना दत्तक घेण्याच्या संकल्प संस्थेने केला आहे आपल्या सर्वांच्या साथीने हा आकडा आम्ही लवकरच संपादित करू व भारत देशामंध्ये युवन महाराष्ट्र मध्ये असणारे क्षयरोग रोगी यांची संभाव्य मदत फाउंडेशन मार्फत करण्यात येईल.
टीबी हरेगा देश जितेगा.
भारती जनकल्याण अन्नछत्र योजना
शहर व तालुक्यांच्या ठिकाणी येणाऱ्या शेतकरी वर्गातील ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या जेवणाची व पोषण आहाराची व्यवस्था करण्यासाठी भारती जनकल्याण फाउंडेशनने उचललेला एक छोटासा उपक्रम भारती जनकल्याण अन्नछत्र योजना या योजनेअंतर्गत भारती जनकल्याण फाउंडेशन फळवाटप अन्न वाटप इत्यादी पोषक आहाराचा अगदी मोफत वितरण करत आहे. ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा संकल्प संस्थेचा आहे.
भारती जनकल्याण मोफत औषधी वितरण योजना
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विविध गाव वस्ती खेड्यामध्ये जाऊन तालुक्यातील तज्ञ डॉक्टर्स ज्यामध्ये सर्व तज्ञ अस्थिरोग तज्ञ दंतरोगतज्ञ पोट विकार तज्ञ मेंदू विकार तज्ञ इत्यादी डॉक्टरांचे शिबिर आयोजित करून गावातील रुग्णांना या शिबिराचा मोफत लाभ मिळवून देण्याचे कार्य भारती जनकल्याण फाउंडेशन या योजनेअंतर्गत करत आहे या शिबिरांमध्ये रुग्णांची मोफत रक्त लघवी तपासणी व त्यांना लागणारी औषधी ही विनामूल्य दिली जाते आतापर्यंत संस्थेने दहा हजार रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे संस्थेचे ध्येय एक लाख रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आहे.
शिक्षा मेरा अधिकार
शिक्षा मेरा अधिकार ही एक भारती जनकल्याण फाउंडेशन ची अशी संकल्पना आहे की ज्या अंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील दलित गरीब शाळकरी मुलांसाठी त्यांना लागणारे पाठ्यपुस्तक दफ्तर पेन वही इत्यादी साहित्य अतिशय मोफत देण्यात येणार आहे.
Products
Show AllCertificates



Videos

19 December 2024

19 December 2024.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Downloads

Gallery
Payment Details

UPI
Inquiry
Links
Developed by AJ Infosoft 2024
© 2024 AJ Infosoft 2024 | All Rights Reserved